गोकुळ शिरगाव वार्ताहर
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे दुरदृष्टीतून गोकुळ एमआयडीसी येथे गोशिमा सब क्लस्टर अद्यायवत असे सेंटर ऑफ एक्सलन्स उभे राहीले आहे. या सेंटरचा उपयोग गोकुळ शिरगाव येथील उद्योजकांना आता होत आहे. हे सेंटर मोठे करण्याचे स्वप्न दिवंगत आमदार जाधव यांचे होते त्या पद्धतीने या सेंटरची वाटचाल चालू असून त्यांच्या स्वप्नातील प्रकल्प आणखीन मोठा करू . आसे मत गोशिमाचे माजी अध्यक्ष अजित आजरी यांनी या फोटो पूजन प्रसंगी आपले मत व्यक्त केले.
या सेंटर मध्ये जाधव यांच्या आठवणी व प्रेरणा कायम राहाव्यात या उद्देशाने येथील अध्यक्ष केबनीमध्ये दिवंगत आमदार जाधव यांची प्रतिमा लावणेचे गोशिमा कार्यकारी संचालक मंडळाच्या मासिक मिटींगमध्ये ठरविण्यात आल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे गोशिमा अध्यक्ष दीपक चोरगे यांनी सांगितले .
रविवार १० सप्टेंबर रोजी सेंटर ऑफ एक्सलन्स पी- ७९, एम.आय.डी.सी. गोकुळ येथील अध्यक्ष केबिनमध्ये दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांची प्रतिमा . आमदार . जयश्री चंद्रकांत जाधव यांचे शुभहस्ते लावण्यात आली. या कार्यक्रमाला गोशिमाचे अध्यक्ष .दिपक चोरगे,उपाध्यक्ष.स्वरूप कदम, .नितीनचंद्र दळवाई,.रणजीत पाटील, मोहन पंडितराव, श्रीकांत पोतनीस, सचिन शिरगांवकर, अजित आजरी, जे.आर.मोटवाणी, सुनिल शेळके, रणजीत मोरे, . योगेश कुलकर्णी, अरुण अराध्ये, अशोक चौगुले, राजवर्धन जगदाळे, नचिकेत कुंभोजकर, प्रशांत मेहता, विज्ञानंद मुंढे, अमोल यादव, विनय चौगुले, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष .संजय शेटे, उपाध्यक्ष.शिवाजीराव पोवार, . धनंजय दुग्गे, कोल्हापूर इंजी.असोसिएशन चे उपाध्यक्ष .बाबासाहेब कोंडेकर, स्मॅक चे उपाध्यक्ष .एम.वाय.पाटील, स्मॅक आयटीआय चे अध्यक्ष .राजू पाटील, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष.मोहन कुशिरे तसेच गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.









