न्हावेली /वार्ताहर
प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी दर्शन घेतले.आज जत्रोत्सवाला त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.यावेळी देवस्थान समितीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघातील जनतेसह महाराष्ट्रातील जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचे साकडे घातले.उपस्थित भाविकांना त्यांनी जत्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.









