बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शैक्षणिक विकासाला प्राधान्य दिले आहे. सत्तेत आल्यापासून त्यांनी अनेक सरकारी शाळांना भेटी देऊन शहरातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत केली आहे.आझम नगर शासकीय शाळेच्या प्रांगणात विज्ञान प्रदर्शन असल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जिज्ञासा व विज्ञानाची आवड पाहून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार फिरोज सेठ उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले कि, “विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्कंठा आणि उत्साह दिसून येत आहे. आणि मला शाळेला भेट देऊन या प्रदर्शनाचा एक भाग बनल्याचा आनंद झाला आहे. मी अधिक चांगल्या सुविधा आपणास देण्यासाठी कठोर परिश्रम घेईन. माझ्या भागातील सरकारी शाळा हि उत्कृष्ट असली पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. माजी आमदार फिरोज सेठ यांनीही विद्यार्थ्यांशी थोडक्यात संवाद साधला. आणि त्यांना चांगला अभ्यास करण्यास, नवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि त्यांचे ज्ञान वाढवत राहण्यासाठी प्रोत्साहित केले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









