बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी कसाई गल्लीला भेट देऊन परिसराची पाहणी केली.त्यावेळी नागरिकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे,त्या भागातील एकूण स्थितीचे मूल्यांकन करणे हा त्या भेटीमागील त्यांचा उद्देश होता. आमदार सेठ यांनी या परिसराची पाहणी करून आणि तेथील रहिवाशांशी चर्चा केली. तसेच तेथील दैनंदिन समस्या देखील जाणून घेतल्या. जेणेकरून त्या सोडविण्यासाठी योग्य तो प्राधान्यक्रम ठरवता येईल. यावेळी रहिवाशांनी त्यांच्या भागातील आमदारांना समस्यांची पाहणी व विचारपूस करताना पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आमदार सेठ यांनी परिसरातील रहिवाशांना आश्वासन दिले की तेथील सर्व तक्रारींचे निराकरण केले जाईल. आणि परिसराची वेळोवेळी पाहणी करण्यात येईल असे आश्वासन आमदार आसिफ सेठ यांनी नागरिकांना यावेळी दिले.
Previous Articleचौकुळ येथील देवी सातेरी-भावईचा जत्रोत्सव उद्या
Next Article वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू









