आमदार आसिफ सेठ यांनी आज बसवन कुडची येथील मराठी सरकारी शाळेची पाहणी केली. शाळेच्या भेटी दरम्यान त्यांनी परिसरातील स्वच्छतागृहाचे उद्घाटन केले. तसेच या शाळेच्या गरजा आणि विकासाची आवश्यकता जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि कर्मचार्यांशी देखील यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, विद्यार्थ्यांना मदत करू शकतील अशा आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तेथील परिसराची पाहणी केली. आमदार सेठ यांनी रहिवाशांना आपण सर्व मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यास कटिबद्ध आहे. नागरिकांना कोणत्याही पायाभूत सुविधेची कमतरता भासणार नाही. आणि या परिसरातील सर्व समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या सोबत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, स्थानिक नगरसेवक व इतर अधिकारी उपस्थित होते.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन