प्रतिनिधी,विटा
सत्ता संघर्षाचे वाचन सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना आमदार अनिल बाबर मात्र मतदारसंघातील विवाह सोहळ्यांना उपस्थित राहण्यात व्यस्त होते.निकालाबाबत कोणताही तणाव न घेता आमदार बाबर यांनी सकाळपासून आपला नित्यक्रम सुरू ठेवला होता.एकीकडे राज्यासह देशाचे लक्ष या सत्ता संघर्षाच्या निकालाकडे लागलेले होते.आमदार अपात्रतेबाबत दाखल याचिकेतील पहिल्या 16 जणांमध्ये आमदार अनिल बाबर यांचा समावेश आहे. मात्र त्याचा तसूभरही तणाव त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हता.
आमदार बाबर यांनी मतदारसंघातील नित्यक्रम सुरूच ठेवला होता.सकाळी विकास कामाबाबत चर्चा आणि दूरध्वनी वरून अधिकाऱ्यांना सूचना देऊन आमदार बाबर घराबाहेर पडले.त्यानंतर ते मतदार संघातील विवाह सोहळ्यांना उपस्थिती लावत होते.सुप्रीम कोर्टात निकालाचे वाचन सुरू असताना आमदार बाबर हे भिवघाट येथील एका विवाह सोहळ्यात उपस्थित होते.कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आपण निर्णय घेतला तेव्हाच निर्धास्त झालो होतो. त्यामुळे आता कशाचेच टेन्शन नसल्याचे त्यांनी सांगितले.मतदार संघातील विकास कामांना गती देण्यासाठी आपण कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








