न्हावेली / वार्ताहर
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून आयोजित नरकासूर स्पर्धेचा शुभारंभ सरपंच मिनल पार्सेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या स्पर्धेचा शुभारंभ ग्रामपंचायत सरपंच मिनल पार्सेकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.या स्पर्धेत एकूण गावातील सहा मंडळांनी सहभाग घेतला होता.तसेच रेडी गावतळेवाडी येथील मोरया ग्रुप व आरोस दांडेली बाजार येथील जय हनुमान मित्रमंडळ या दोन मंडळाचे नरकासूर प्रदर्शनीय म्हणून सहभागी झाले होते.ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून आयोजित गाव मर्यादित नरकासूर स्पर्धेमध्ये मिक्स बॅाईस सावळवाडी यांनी प्रथम क्रंमाक पटकावला.द्वितीय क्रमांक काशी कल्याण ब्राम्हणदेव कुंभारवाडी मंडळाने तर तृतीय क्रमांक श्री मुसळेश्वर मंडळ हेदूलवाडी व रॅाकस्टार मंडळ नाईकवाडी यांना विभागून देण्यात आली.
त्याचबरोबर नाईकवाडी येथील लिटर बॅायमंडळ व श्री ब्राम्हणदेव कोंडुरे मंडळाला सहभागाबद्दल सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेच्यावेळी शालेय मुलांसाठी घेण्यात आलेल्या आकाश कंदील स्पर्धेत तसेच ग्रामपंचायत कडून आयोजित आकाश कंदील स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ करण्यात आला.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे,माजी सरपंच लाडोबा केरकर,पोलीस पाटील दिंगबर मसुरकर,ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,सखाराम जाधव,कविता शेडगे,सानिका शेवडे,अर्जुन मुळीक,परशुराम मुळीक,तसेच परीक्षक अनिकेत आसोलकर दीपेश शिंदे गौरव सावंत यांनी काम पाहिले आकाश कंदील स्पर्धा व नरकासूर स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने रसिकांनी गर्दी केली होती रसिक प्रेक्षकांच्या गर्दीमुळे मळेवाड जकातनाका चौक हा फुलून गेला होता.









