वृत्तसंस्था / बेंगळूर
येथे सुरू असलेल्या 86 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत माजी विजेत्या मिथुन मंजुनाथ, सौरभ वर्मा आणि चिराग सेन यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत तिसरी फेरी गाठली.
दुसऱ्या फेरीतील सामन्यात मिथुन मंजुनाथने तृतिय मानांकित भारत राघवचा 21-9, 21-18 तसेच सौरभ वर्माने अभिनव गर्गचा 21-17, 21-17, माजी विजेत्या चिराग सेनने जित पटेलचा 21-15, 21-15 असा पराभव करत एकेरीची तिसरीफेरी गाठली. महिला एकेरीत अनमोल खराबने दिपाली गुप्ताचा 21-8, 21-6 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. तन्वी शर्माने तिसरी फेरी गाठताना फ्लोरा इंजिनिअरचा 21-8, 21-6 अशा फडशा पाडला.









