ओटवणे / प्रतिनिधी
Mission Aadhaar’s ‘Mission Jeevan’ initiative launched in Sawantwadi!
पक्षी व प्राण्यांसाठी ठिकठिकाणी ठेवली पाण्याची भांडी
कडक उन्हाळ्यात पक्षी व प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मिशन आधारतर्फे मंगळवारी सावंतवाडीत मिशन जीवन उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी शिवउद्यान येथुन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकिय अधीक्षक डॉ. दुर्भाटकर यांच्याहस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गतमळगाव घाट, शिल्पग्राम रोड, सावंतवाडी मच्छी मार्केट जवळ, आणि पाटबंधारे विभाग चराठा कॉलनी आदी ठिकाणी पाण्याची भांडी ठेवण्यात आली. यावेळी जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष परिमल नाईक, सेवानिवृत्त शिक्षक नाडकर्णी, सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी गजानन परब, पाटबंधारे खात्याचे संदीप राणे आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मिशन आधारच्या या भुतदयेचे अर्थात मिशन जीवन या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी मिशन आधारचे उपाध्यक्ष आनंद पुनाळेकर, प्रसाद नाडकर्णी, वैभव घाग, विश्राम केळुसकर ऋषिकेश खानोलकर, वामन सावंत, तुषार रेमुळकर, ओमकार शिरोडकर, सोनाप्पा गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









