सौ. रिया दळवी गेले दोन दिवस होत्या बेपत्ता
ओटवणे | प्रतिनिधी
गेले दोन दिवस बेपत्ता असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील विलवडे मळावाडी येथील सौ रिया राजाराम दळवी ( ३०) या विवाहितेचा मृतदेह बुधवारी सकाळी खांबलेश्वर मंदिर नजिकच्या ओहोळात आढळून आला. घारपी येथे माहेर असलेल्या सौ . रिया राजाराम दळवी यांचे दिड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्या काही दिवसापूर्वी माहेरी गेल्या होत्या . त्यानंतर त्या सासरी आल्या होत्या . मात्र दोन दिवसांपासुन ती बेपत्ता झाली होती. तिचा सर्वत्र शोध सुरू होता. बांदा पोलीस स्थानकातही याबाबत तक्रार देण्यात आली होती.दरम्यान बुधवारी सकाळी सौ रिया दळवीयांचा मृतदेह ओहोळात आढळून आल्यानंतर याबाबतची माहिती ग्रामस्थांनी बांदा पोलिसांना दिली. त्यानंतर बीट अंमलदार श्री तेली, सरपंच प्रकाश दळवी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.









