Ratnagiri Crime News: ऐन नवरात्रोत्सवात रत्नागिरी खालचा फगरवठार येथील बेपत्ता विवाहितेचा मृतदेह अडीचशे फूट खोल दरीत सापडला. सोमवारी सायंकाळी रत्नदुर्ग किल्ल्याच्या कपल पाँईट खाली हा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे आत्महत्या की घातपात याबाबत परिसरात उलटसुटल चर्चांना उधाण आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी रितेश घाणेकर ( वय -३३ ऱा परटवणे खालचा फगरवठार रत्नागिरी) असे या महिलेच नाव आहे. तन्वी २९ सप्टेंबरच्या रात्री ७ च्या सुमारास घरातून आपली दुचाकी घेऊन घराबाहेर पडली. घरी येण्यास उशीर झाला तर जेवण करून घ्या असा निरोप तिने आपल्या मुलीला दिला. मात्र रात्री ती घरी परतली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतही तन्वी हिचा थांगपत्ता न लागल्याने दुपारपर्यंत तिच्या कुटुंबियांनी आणि पती रितेश याने तन्वी ही बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. यानुसार पोलीसांनी शोधकार्य सुरु केले.
या तपासादरम्यान पोलिसांनी शहर व आजूबाजूचा परिसर माहितीसाठी पिंजून काढला. दरम्यान ३० सप्टेंबर रोजी तन्वीची दुचाकी रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवळाच्या समोर आढळून आली. तन्वीकडे असलेल्या मोबाईल चे लोकेशन ट्रक केले असता लोकेशन शहराबाहेरच्या परिसरात असल्याचे तपासात निष्पन्न झाल़े. दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रत्नदुर्ग किल्ल्यावरील कपल पॉईंटच्या खाली सुमारे २०० ते २५० फूट खोल दरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आल़ा. ही माहिती पोलीसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह खोल दरीत समुद्राच्याकडेला असल्याने तो बाहेर काढणे अवघड होते. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या महिलेचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेहाविषयी खातरजाम करण्यात आल़ी त्यावेळी हा मृतदेह तन्वी घाणेकर हिचाच असल्याचे शिक्कामार्तब पोलिसांनी केल़. याविषयी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









