कसबा वाळवे वार्ताहर
राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील माध्यमिक शाळेतील मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन चुकीचे वर्तन करणाऱ्या विजयकुमार परशुराम बागडी(वय५२) मुळ गाव सोळांकुर ता.राधानगरी सध्या रा.फुलेवाडी रिंगरोड या शिक्षकाला मुख्याध्यापक प्रभाकर भुपाल कोले यांनी फिर्याद पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोन तासातच उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी अटक केली.या प्रकरणामुळे संपुर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.
शेळेवाडी येथील माध्यमिक शाळेतील पंधरा ते सोळा वयोगटातील सात मुलींचे महिनाभरापुर्वी लैगिक शोषण झाले होते.या गंभीर प्रकरणाची माहीती मिळताच ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांनी संबधित संस्थेकडे तक्रार केल्यानंतर बागडीची बदली करण्यात आली. त्यानंतर समुपदेशन करण्यासाठी गेलेल्या गीता हसुरकर यांना शोषीत मुलींनी घडलेल्या प्रकाराची माहीती दिली.मुलींच्या धाडसीवृतीमुळे या प्रकरणाला वाचा फुटली.मुख्याध्यापक प्रभाकर कोले यांनी आज सकाळी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दिल्यानंतर बागडीस अटक करण्यात आली.अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत.
शेळेवाडी शाळेतील घडलेली घटना खरी आहे ही घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी संस्थेकडे तक्रार केली त्यानंतर संबंधित शिक्षकाची बदली दुसऱ्या ठिकाणी केली घृणास्पद कृत्य करणाऱ्या या शिक्षकावर जास्तीत जास्त कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे. रीना पाटील सरपंच शेळेवाडी