वृत्तसंस्था/ मुंबई
इंडिगोच्या विमानात एअर होस्टेसचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकतीच एका स्वीडिश नागरिकाला अटक केली. मद्यधुंद अवस्थेत त्याने एअर होस्टेसचा हात पकडल्याचा आरोप आहे. हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाला त्याने मारहाण करून गोंधळ घातल्याचेही सांगितले जात आहे. बँकॉकहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6ई-1052 मध्ये ही घटना घडली. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संबंधिताला पोलिसांच्या ताब्यात दिले. क्लॉस एरिक हॅराल्ड जोनास असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला जामीन मिळाला आहे.









