सभापती रमेश तवडकर यांचे पत्रकार परिषदेत शरसंधान : कला, संस्कृती खात्यात घोटाळा न झालेल्या कार्यक्रमाला दिले विशेष अनुदान
पणजी : सभापती रमेश तवडकर यांनी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून त्यांनी निधीचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या कला व संस्कृती खात्यात घोटाळा झाल्याचेही तवडकर यांनी नमूद केले. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी तवडकर यांनी केली आहे. सदर प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, गोवा फॉरवर्डचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर काँग्रेस पक्षाने देखील गावडे यांची हकालपट्टी करावी आणि ते करायला जमत नसेल तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजीनामा द्यावा, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी म्हटले आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर तवडकर यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले. काणकोण तालुक्यातील खोतीगाव पंचायत क्षेत्रातील ये•ा प्रभागात न झालेल्या कार्यक्रमासाठी ऊ. 27 लाख खर्च केल्याचे दाखवून कला व संस्कृती खात्याने ते विशेष अनुदान दिल्याची माहिती तवडकर यांनी दिली.
डॉ. सावंत यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली असून गावडे यांनी शिस्त, शिष्टाचार यांना फाटा देऊन हे अनुदान खर्च केल्याचे आरोप तवडकर यांनी केले. एकाच घरातील दोन संस्थांना अशा प्रकारे अनुदान देण्यात आले आहे. डॉ. सावंत यांनी गावडेतर्फे कोणत्या मतदारसंघात किती अनुदान दिले याची तपशील कला व संस्कृती खात्याकडून मागवला असल्याचे तवडकर म्हणाले. आपल्या मतदारसंघातील एकाच गावातील प्रभागात विशेष अनुदान देण्याचा हेतू संशयास्पद आहे. आपल्याच सरकारमधील एक मंत्री विरोधात वागतो हे धक्कादायक असून ते खेदजनक असल्याचे तवडकर यांनी नमूद केले. मंत्री बेफिकीरीने वागतात आणि वरिष्ठांना अडचणीत आणतात. हे कार्यक्रम झालेलेच नाहीत मग खर्च कसा करण्यात आला? असा प्रश्न तवडकर यांनी उपस्थित केला. त्यासाठी स्थानिक सरपंच, पंच यांनाही निमंत्रण नव्हते याकडे तवडकरांनी लक्ष वेधले. विशेष अनुदान मंत्र्यांच्या अनुमतीशिवाय मिळणे शक्य नाही. ऊ. 5 लाखपर्यंत अनुदान मंजूर करण्याचे अधिकार मंत्र्यांना आहे याकडेही तवडकर यांनी लक्ष वेधले.
गावडे यांनी राजीनामा देणे योग्य : सरदेसाई
गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई म्हणाले की, सभापतींनी एका मंत्र्यावर केलेले आरोप अतिशय गंभीर स्वऊपाचे आहेत. या आरोपांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने त्वरित चौकशी सुऊ करावी आणि गावडे यांनी आता पद सोडावे अशी मागणी सरदेसाई यांनी केली. सभापतीच मंत्र्यांवर टीका करतात आणि ते सुद्धा भ्रष्टाचाराचे! मंत्र्यांची स्थिती आता अस्थिर बनली असून एवढी नाचक्की झाल्यानंतर गावडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देणे योग्य ठरते, असे सरदेसाई यांनी नमूद केले. गावडे यांनी पद सोडून चौकशीला सामोरे जावे, असा सल्ला सरदेसाई यांनी दिला.
कोणत्याही चौकशीस तयार : गोविंद गावडे
आपला व खात्याचा कारभार पारदर्शक असून कोणत्याही चौकशीस तयार असल्याचा दावा मंत्री गोविंद गावडे यांनी केला आहे. विशेष अनुदान हे कार्यक्रम करण्यासाठी संस्थांना दिले जाते. कार्यक्रमावर खर्च झाल्यास तसे लेखापालाचे प्रमाणपत्र द्यावे लागते. कार्यक्रम व खर्च न झाल्यास संस्थेकडून निधी परत घेतला जातो, असा खुलासा गावडे यांनी केला आहे. मला विनाकारण लक्ष्य करण्यात आले असून खिरापत वाटलेली नाही. अधिवेशनाचे निमित्त कऊन सभापतींनी आरोप केले हे पाहून वाईट वाटले. त्यांनी जऊर चौकशी करावी पण खोटे आरोप कऊ नयेत. तवडकर यांच्या संस्थांना खात्यातर्फे सर्वाधिक मदत दिली जाते. निधी वाटताना पक्ष, संस्था पाहिल्या जात नाहीत, असे गावडे म्हणाले.