रत्नागिरी :
एकीकडे शासनाने १०० दिवसात वेगवेगळे उपक्रम राबवून गतिमान प्रशासन करण्यावर भर दिला आहे. पण कोकण किनारपट्टीवर रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अस्वच्छतेने या बंदर परिसराला गलिच्छ स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे. तुटलेल्या नौकांचे सांगाडे, प्लास्टीकचा बंदराच्या भागात साचलेला खच, कचरा या साऱ्या गोष्टीमुळे येथील बकाल स्वरूप प्रकर्षान समोर येत आहे.
या साऱ्या गलिच्छ परिसरामुळे मिरकरवाडा बंदरातील स्वच्छता केव्हा केली जाणार, असा प्रश्न नागरिक तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांमधूनही उपस्थित केला त्यांचे कुजत पडलेले सांगाडे. जात आहे. या बंदर विकासासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासन स्तरावरून धडक मोहीम राबवण्यात आली. बंदर विकासासाठी या परिसरातील अनधिकृत बांधकामे काढण्यात आली. मात्र चौथी जेटी गाळात बुडाली आहे. तिथे जुन्या मच्छीमारी नौकांचे सांगाडे गेले अनेक वर्षे तसेच खितपत पडले आहेत. या बोटी संबंधित नौकां मालकांनी काढणे आवश्यक आहे. आज कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे बंदर म्हणून मिरकरवाडा ओळखले जात आहे. या बंदराची जबाबदारी प्राधिकरण व मत्स्य विभागावर आहे. बंदर विकासासाठी काही दिवसांपूर्वी या परिसरातील अनधिकृत बांधकामे काढण्यात आली. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी महत्वाची भूमिका बजावत मिरकरवाडा बंदर विकासासाठी टप्पा-२ मधून निधीही दिला आहे. या निधीतून बंदरातील ४ जेटींचे मजबुतीकरण केले जाणार आहे. सध्या पहिल्या ३ जेटींचा उपयोग नौका उभ्या करण्यासाठी होतो. मात्र चौथी जेटीच्या ठिकाणचे गलिच्छ स्वरूप येथील असस्वच्छतेवर शिक्कामोर्तब करत आहे.
- बंदराचा विकास कधी होणार?
पाण्यात जुन्या मच्छीमारी नौकांचे सांगाडे खितपत पडले आहेत. मत्स्य विभागाकडून त्या नौका काढण्यासाठीच्या कार्यवाहीकडे कानाडोळा करण्यात आला आहे. या बंदरात ओहोटीवेळी साचलेला चिखल प्रकर्षाने समोर दिसतो. प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली तर भविष्यात या बंदरात अनेक मच्छीमारी नौका उभ्या करण्यासाठी जागाही उपलब्ध होणार आहे. याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. या बंदराच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन बंदराचा विकास कधी होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.








