मिरज एमआयडीसी (Miraj MIDC) मधील गंगा प्लॅस्टिक या प्लॅस्टिक वर रिसायकल करणाऱ्या इंडस्ट्रीज मध्ये अचानक भीषण आग लागली. यामध्ये लाखोचे नुकसान झाले आहे. आगिचे कारण असप्ट आहे. आग्निशामन दलाच्या सात बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात आले. आग लागल्याची वर्दी नागरिकांनी दिल्यानंतर सांगली अग्निशमनदलाचे प्रमुख विजय पवार हे आपल्या टिम सोबत ताफा घेऊन घटना स्थळी गेले.
यावेळी सांगलीतील आग्निशामन दलाच्या ४, एमआयडीसी अग्निशमन दलाची १, कोल्हापूर मनपाची १ व तासगाव नगर परिषदेची एक अशा एकूण ६ अग्निशमन दलाच्या वाहनांनी २२ खेपा पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविण्यासाठी ५ तासाचा कालावधी लागला आहे.या कामगिरीवर मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार ड्रायव्हर सतीश वाघमारे,सुरेश आलगुर,दत्ता माने,शशिकांत चव्हाण,इक्बाल मुल्ला,लिंगाप्पा कांबळे फायरमन रोहित घोरपडे,प्रसाद माने,विशाल रसाळ,चंद्रकांत झेंडे,अविनाश चाळके,रोहित निकम आदी उपस्थित होते. जीव धोक्यात घालुन आग्निशाम दलाच्या जवानानी आग विझविण्याचा प्रयत्न केला.यात कोणत्याही जीवीत हाणी झाली नाही. यावेळी पहाटे नागरिकांनी गर्दी केली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








