बाप-लेक, भाऊबंद गुंतले टक्केवारीच्या धंद्यात
मिरज प्रतिनिधी
शहरात पुन्हा एकदा खासगी सावकारांच्या टोळीने थैमान घातल्याचे दिसत आहे. येथील हॉटेलसाठी सिलेंडर टाक्या विक्री करणारा युवा व्यवसायिक प्रेम मदनानी याला खासगी सावकार धोंडीराम घोडके पिता-पुत्रांनी जबर मारहाण केली. दहा लाख ऊपयांच्या बदल्यात 30 लाख वसूल कऊनही आणखी 47 लाख ऊपयांची मागणी करण्यात आली. काही वर्षांपूर्वी शहरातील तंतूवाद्य व्यवसायिक संजय मिरजकर यांनाही अशाच पध्दतीने सावकारांनी घेरले हेते. त्यानंतरही शहरात अशी सोनेरी टोळी राजरोसपणे खासगी सावकारीचा गोरखधंदा करीत असल्याचे दिसत आहे. उद्योजक, व्यवसायिकांच्या गळ्याभोवती खासगी सावकारीचा फास आवळला असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीच या सावकारीचा भस्मासूर ठेचून काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
येथील खासगी सावकार आणि मटकाबुकी धोंडीराम घोडके याच्याकडून युवा व्यवसायिक प्रेम मदनानी याने 15 टक्के व्याज दराने दहा लाख ऊपये घेतले होते. त्या बदल्यात पाच वर्षामध्ये व्याजासह 30 लाख ऊपये परत दिले. तरीही घोडके हा आणखी 47 लाख ऊपयांची मागणी करीत होता. पैशांच्या वसूलीसाठी त्याने आपल्या दोन्ही मुलांना संबंधीत व्यापाऱ्याच्या अंगावर सोडले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि सतत नशेच्या गोळ्या खावून खुन्नशी वागणाऱ्या विशाल व विश्वेश घाडके या दोघा पुत्रांनी व्यापारी प्रेम मदनानी यांना गणेश विसर्जन मिरवणुकीतून बाजूला घेत धमकावून फायटरने जबर मारहाण केली. घडल्या प्रकारानंतर संबंधीत व्यापाऱ्याने पोलिसात धांव घेऊन तक्रार दिली.
या प्रकारानंतर खासगी सावकार पिता-पुत्र घोडके कंपनीचा बुरखा टराटरा फाटला आहे. काही दिवसांपूर्वीच धोंडीराम घोडके याचा वाढदिवस थाटात झाला. त्याच्यावर एका अवसायनात गेलेल्या बँकेचे सुमारे दीड लाख ऊपयांचे कर्ज आहे. ज्या दिवशी त्याचा वाढदिवस होता, त्याच दिवशी संबंधीत बँकेने त्याच्या विऊध्द नोटीसही जारी केली होती. तरीही पोलिसांनी घोडके याच्या बॅनरबाजीकडे दुर्लक्ष केले. मटक्याचा खेळ, पैशांचा मेळ, लाखोंची उलाढाल, व्याजाचा धंदा, पठाणी वसूली, हाताखाली पाळलेले गुंड आणि पोलिस प्रशासनातील ‘डीबी’वाल्यांसोबत आर्थिक हितसंबंध हा घोडकेचा अवैध व्यवसायितील सामाजिक बुरखा पांघरलेला पण राजरोसपणे सर्वसामान्यांचा गळा घोटणारा ‘घोडेबाजार’ आहे. प्रभागातीलच काही बड्या नगरसेवकांना हाताशी धऊन त्याचा मटका व खासगी सावकारीचा व्यवसाय सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मिरज शहराला खासगी सावकारी नवीन बाब नाही. यापूर्वीही खासगी सावकार शंतनू कोळीच्या टोळीने तंतूवाद्य व्यवसायिक संजय मिरजकर यांना अशाच पध्दतीने घेरले होते. 50 लाखांच्या बदल्यात दीड कोटी ऊपये वसूल केले होते. सावकारांच्या त्रासाला कंटाळून मिरजकर हे बेपत्ता झाले. त्यानंतर कोळीची सावकारी टोळी उघडकीस आली. आणि तत्कालीन पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, पोलिस उपाधीक्षक संदिपसिंग गिल यांनी केवळ 36 तासात तपास कऊन खासगी सावकार शंतनू कोळीच्या टोळीला मोक्का लावला होता. त्यानंतरही म्हैसाळ येथे रामचंद्र धुमाळ व शैलेश धुमाळ या बाप-लेकाने व्याजाच्या वसूलीसाठी महिलेचे घर आणि हॉटेल बळकावले. तेव्हा पोलिसांनी घरात छापा टाकून कोरे धनादेश, दागिने आणि रोकड हस्तगत केली. पण खासगी सावकारांचा कायमचा बिमोड करण्याचे धारिष्ट्या दाखविले नाही.
उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नसलेले हे खासगी सावकार सामाजिक कार्यकर्त्याचा बुरखा पांघऊन समाजात वावरतात. त्यांनी अलीकडील काही वर्षात मिळविलेली संपत्ती, बंगले, गाड्या आणि सोन्याच्या दागिन्यांने मडलेल्या सावकारांचे वैभव पाहून सर्वसामान्य अचंबित होतात. किरकोळ कर बुडविणाऱ्यांच्या घरावर आयकरचे छापे पडतात. मग सावकारीतून कोट्यावधींची माया मिळविणारे सावकार मोकाट का? असा सवाल उपस्थित होतो. या सावकारांनी विशेष कऊन उद्योजक, व्यापाऱ्यांनाच घेरले असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. अन्यथा सावकारांच्या पाशात अडकून गरीबांची घरे उध्दवस्त होतील. त्यामुळे सावकारांना ठेचण्याची गरज आहे.








