वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इटलीतील सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व चषक शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज मिराज अहमद खान आणि गनेमत सेखाँ यांनी पहिल्या फेरीअखेर आघाडीचे स्थान मिळविले आहे.
पुरूषांच्या स्कीट नेमबाजीत मिराज अहमद खानने 24 आणि 25 शॉटस् तर महिलांच्या विभागात गनेमत सेखाँने 23 आणि 25 शॉटस् नोंदवित पहिल्या फेरीअखेर आघाडीचे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत भारताच्या 6 स्पर्धकांनी सहभाग दर्शविला आहे. पहिला नेमबाज गनेमतने यापूर्वी विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक गटात 2 पदके मिळविली आहेत.









