वृत्तसंस्था/ दुबई
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या दुबई खुल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत रशियाच्या 17 वर्षीय मीरा अँड्रीव्हाने एकेरीचे जेतेपद पटकाविताना क्लेरा टॉसनचा अंतिम फेरीत पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अँड्रीव्हाने टॉसनवर 7-6 (7-1), 6-1 अशा सरळ सेट्समध्ये मात करुन विजेतेपद पटकाविले. अँड्रीव्हाच्या टेनिस कारकिर्दीतील हे सर्वात मोठे विजेतेपद म्हणावे लागेल. या स्पर्धेत अँड्रीव्हाने पोलंडच्या टॉप सिडेड स्वायटेकचा तसेच त्यानंतरच्या सामन्यात रायबाकीनाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. गेल्या वर्षी अँड्रीव्हाने रुमानियातील लासी खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती.









