चीनमध्ये कोरोना विषाणूनंतर पसरणाऱ्या नवीन आजाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 सारख्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. या आजाराबाबत घाबरून जाऊ नये, असे मंत्रालयाने म्हटले आहे. यासाठी घाबरण्याची गरज नाही. फक्त नियम पाळत राहा.अशा सूचना स्वास्थ्य मंत्रालयाने दिल्या आहेत.
हा आजार लहान मुलांवर जास्त होतो. चीनमधील सरकारने अनेक शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत यावरून या आजाराचे गांभीर्य लक्षात येते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीनमधील सार्वजनिक आरोग्याची बदलती परिस्थिती लक्षात घेता श्वसनाच्या आजारांविरुद्धच्या तयारीच्या उपायांचे सक्रियपणे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय सज्जता उपायांचे त्वरित पुनरावलोकन करण्याचा सल्ला दिला आहे.
साधारणपणे, इन्फ्लूएन्झा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, SARS-CoV-2 सारख्या सामान्य कारणांमुळे श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होते. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. असं आरोग्य मंत्रालयाने लोकांना सांगितले आहे.