राजनाथ सिंह , अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोमवार, 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक झाली. गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डाआणि किरेन रिजिजू यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते. रविवारी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. 21 जुलैला सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 ऑगस्ट रोजी संपणार आहे.
राजनाथ सिंह आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संसद अधिवेशनासाठी सरकारच्या भूमिकेवर रणनीती आखल्याचे मानले जाते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री न•ा आणि संसदीय कामकाज मंत्री रिजिजू यांच्याव्यतिरिक्त त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी पियुष गोयल आणि जी किशन रेड्डा यांनीही बैठकीला हजेरी लावली. सध्या विरोधी पक्ष संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बिहारमधील मतदारयाद्यांचे विशेष सर्वेक्षण (एसआयआर), पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यासह अनेक मुद्दे उपस्थित करण्याची तयारी करत आहे. विरोधकांच्या या मुद्यांना कसे प्रत्युत्तर द्यायचे याबाबत मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाली.









