रॅलीसह मिरवणूक
ताराराणी चौकातून होणार मिरवणुकीला सुरुवात
कोल्हापूर
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर कोल्हापुरात येणार असून महायुतीमार्फत त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. शहराच्या प्रमुख मार्गावरून त्यांची मिरवणूक काढली जाणार आहे. सकाळी 9.30 वाजता दोन्ही मंत्री श्री अंबाबाईचे दर्शन घेणार असून त्यानंतर ताराराणी चौकातून सकाळी 10.30 च्या सुमारास त्यांच्या मिरवणुकीस सुरुवात होणार आहे.
मंत्री मुश्रीफ आणि आबिटकर कावळा नाका येथे आल्यानंतर तेथून महायुतीच्या वतीने हजारो मोटरसायकींची रॅली काढली जाणार आहे. ही रॅली ताराराणी चौक, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी चौकातून जाणार असून महामानवांना अभिवादन केले जाणार आहे. तेथून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीची सांगता होणार आहे.








