प्रतिनिधी/ पुंकळ्ळी
समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सपत्नीक श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानला शुक्रवारी भेट देऊन देवीचा आशीर्वाद घेतला तसेच अलका फळदेसाई यांनी खणा-नारळाने देवीची ओटी भरली. त्यांच्यासोबत पुत्र शुभम व कन्या शुभ्रा फळदेसाई यांनीही दर्शन घेतले. देवीचा जत्रोत्सव सुरू असल्याने मंत्री फळदेसाई यांनी ही भेट दिली.
मंत्री फळदेसाई यांनी नंतर देवस्थान कार्यालयाला भेट देऊन उत्सवाची माहिती जाणून घेतली. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी केलेल्या सोयी व उत्सवासाठीची इतर व्यवस्था पाहून त्यांनी देवस्थान समितीच्या पदाधिकाऱयांची प्रशंसा केली. समितीचे अध्यक्ष कवेंद्र नाईक देसाई, सचिव विराज देसाई, खजिनदार दर्शन देसाई व मुखत्यार सुभाष देसाई यांनी त्यांचे उस्फूर्त स्वागत केले. कुंकळ्ळीचे नगरसेवक विदेश देसाई हेही उपस्थित होते. यावेळी समितीने मंत्री सुभाष फळदेसाई यांचा श्रीफळ व देवीची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. अलका फळदेसाई यांना देवीच्या मूर्तीवर वापरलेले कापड व खण देऊन सन्मानित करण्यात आले.
1231 cuncolim 1
पुंकळ्ळी ः श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानच्या जत्रोत्सवानिमित्त समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत अलका फळदेसाई, शुभम फळदेसाई, शुभ्रा फळदेसाई, नगरसेवक विदेश देसाई, देवस्थान समितीचे अध्यक्ष कवेंद्र नाईक देसाई, सचिव विराज देसाई, खजिनदार दर्शन देसाई व मुखत्यार सुभाष देसाई.









