कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाकडून जाहीर
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह तिघा जणांना म्हैसूरच्या कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाची मानद डॉक्टरेट जाहीर झाली आहे. विद्यापीठाच्या 20 व्या पदवीदान समारंभात मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे. आयडीएल एज्युकेश सोसायटीचे चेअरमन सी. एम. इरफानुल्ला शरीफ आणि कलबुर्गीतील शरणबसवेश्वर विद्यावर्धक संघाचे चेअरमन डॉ. दाक्षायिणी यांना देखील कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाची मानद डॉक्टरेट जाहीर झाली आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह तिघांना विद्यापीठाच्या 20 व्या पदवीदान समारंभात डॉक्टरेट प्रदान करण्यासाठी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती थावरचंद गेहलोत यांनी संमती दर्शविली आहे.राज्यपालांचे सचिव बी. बी. प्रशांतकुमार यांनी विद्यापीठाच्या कुलगुरुंना यासंबंधी पत्र पाठवून माहिती दिली आहे.









