प्रतिनिधी /वास्को
पंचायत व वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याहस्ते सोमवारी मुरगांव पालिकेला लोकसेवेसाठी वाहन प्रदान करण्यात आली. याप्रसंगी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगांवचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स, मुख्याधिकारी जयंत तारी व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री गुदिन्हो यांनी सरकार केंद्रीय निधींअंतर्गत जास्तीत जास्त कामे करण्याचा विचार करीत आहे. मुरगांव पालिकेने जास्तीत जास्त थकबाकी वसुल करावी. थकबाकी वसुलीसाठी त्यांनी मोहिम राबवली पाहिजे असे ते म्हणाले.
आमदार दाजी साळकर यांनी पालिकेला चार वाहने उपयुक्त ठरणार असल्याचे स्पष्ट केले. मोठे ट्रक अडगळीच्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. कचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत दोन नवीन ट्रक व दोन रिक्षा मिळतील असे ते म्हणाले.
नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स यांनी कचरा उचलण्यासाठी दोन वाहने वापरली जातील तर इतर दोन वाहने पालिका कर्मचाऱयांसाठी वापरण्यात येतील अस स्पष्ट केले. स्वच्छता मोहिमेदरम्यान अवजड वाहने जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी या वाहनाचा तसेच अधिकाऱयांसाठी या गाडय़ांचा वापर केला जाईल असे ते म्हणाले.









