वार्ताहर/बाळेकुंद्री
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगराला व यल्लम्मा देवस्थानला शुक्रवारी राज्याचे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट देऊन श्री यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले. यावेळी यावेळी मंदिराच्यावतीने सौंदत्तीचे आमदार डॉ. विश्वास वैद्य, नवलगुंदचे आमदार एन. एच. कोनरेड्डी, मंदिराचे सीईओ महेश यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी देवस्थानचे अधीक्षक नागरत्ना चोळीन, मल्लू जकाती, कर्मचारीसह पुजारीवर्ग उपस्थित होता.









