ठेकेदारांना केल्या सूचना; स्थानिकांतून समाधान व्यक्त
बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निरंतरपणे विकासकामे करणाऱ्या महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी सकाळी विविध भागाना भेट देऊन कामांची पाहणी केली. प्रथम, गणेशपूर येथे सुमारे 2.10 केटी रु. खर्चातून सुरू असलेल्या उद्यानाच्या विकासकामाची पाहणी केली. सरस्वतीनगरातील सिद्धिविनायक मंदिर आवारात सुरू असलेल्या उद्यानकामाची पाहणी करून ठेकेदाराना सूचना केल्या. फ्रिडम फायटर कॉलनी व उर्वरित दोन उद्यानातील, तसेच प्रेस कॉलनीतील उद्यानाची पाहणी करून संबंधितांना काही सूचना केल्या. हिंडलगा येथे सुरू केलेल्या 2.15 कोटी रु. खर्चाच्या विविध उद्यानांच्या कामाचा आढावा घेतला.
मराठा कॉलनी, विनायकनगर, विद्यानगर हाऊसिंग कॉलनी, एमईएस कॉलनी, डिफेन्स कॉलनी (सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटी) येथे सुरू असलेल्या उद्यान कामाची पाहणी करून संबंधितांकडून विकासकामाची माहिती घेतली. सह्याद्रीनगराच्या संपूर्ण विकासासाठी 6.14 कोटी रु. अनुदानातून सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. सह्याद्रीनगरात सुरू असलेल्या रस्ते, गटारी, पेव्हर्स बसविण्याच्या कामाची पाहणी करून ठेकेदारांकडून माहिती घेतली. याचवेळी महाबळेश्वर मंदिर जीर्णोद्धार व उद्यान कामाची पाहणी केली. त्यानंतर, डॉ. बी. आर. आंबेडकर भवनाला भेट देऊन उद्यान विकासकामाची पाहणी केली. मंत्री हेब्बाळकर यांनी विविध स्थळांना स्वत: भेट देऊन विकासकामाची पाहणी केल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.









