हुबळी: काही दिवसापूर्वी हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये चाकूने भोसकून निष्पाप विद्यार्थिनीचा निघृण खून करण्यात आला होता. महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज शनिवारी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या कि, मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण देखील सहभागी आहोत आणि आपण त्यांच्या सोबत आहोत. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल. खून प्रकरणाचे आपण निषेध करतो. मृत विद्यार्थिनीचे वडील देखील काँग्रेसचेच नगरसेवक आहेत. आपण त्यांच्या सोबत असून त्यांच्या मुलीच्या खून प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. आशा संदर्भात राजकीय वाद करणे योग्य नाही असे सांगितले.
याप्रसंगी हुबळी पोलीस आयुक्त रेणुका शशिकुमार, युवा काँग्रेस प्रमुख रजत उळ्ळागड्डीमठ, मनपा विपक्षी नेत्या सुवर्ण कल्ल कुंटल, मोहन लिंबीकाई, बंगारेश हिरेमठ, राजशेखर मनसीनकाई व इतर उपस्थित होते.









