परिसराच्या समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन
बेळगाव : महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नुकतीच कुमारस्वामी लेआऊट परिसराला भेट देऊन पाहणी केली. मुख्य रस्त्यांचा विकास, वीज, पाणी, उद्यानांचा विकास, स्वच्छता, पथदीप आदींची पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक क्षेमाभिवृद्धी संघटनेच्यावतीने लक्ष्मी हेब्बाळकर यांचा गौरव करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष व्ही. जी निरलगीमठ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. नगरसेवक संदीप जिरग्याळ, सी. बी. संगोळ्ळी, एस. एस. गंगापूर, अरविंद जोशी, योगेश तळवार, मल्लिकार्जुन रोट्टी, पट्टणशेट्टी, बी. आय. पाटील, रुद्राण्णा चंदरगी, सुभाष हल्लोळ्ळी, राजू मंजरगी आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. पायी चालत संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर शिवालयात त्यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी विकासासंबंधी निवेदन दिले. तुमच्या मागण्या काय आहेत? याची पाहणी करून टप्प्याटप्प्याने कामे हाती घेण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.









