राजू शेट्टी यांनी जिल्ह्या बँकेत सीएंची एक कमिटी पाठवून जिल्ह्यातील कारखान्यांच्या अर्थिक परिस्थीचा आढावा घ्यावा. यामध्ये जे कारखाने कर्जमुक्त असतील किंवा नफ्यात असतील त्यांना राजू शेट्टींच्या मागणी प्रमाणे द्यायला लावू असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना केले आहे.
नक्की पहा VIDEO>>> राजू शेट्टी यांनी आपल्या सीएंच्या कमिटीमार्फत ‘त्या’ कारखान्यांची चौकशी करावी- हसन मुश्रीफ
दसरा महोत्सवानिमित्त कोल्हापूरात आज शिवकालीन मर्दानी खेऴांचे आयोज केले होते. या कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजू शेट्टी यांच्या साखर कारखानदारांना मागील हंगामातील एफआऱपीतील 400 रूपये न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. पत्रकारांनी राजू शेट्टींच्या इशाऱ्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असता. ते म्हणाले “राजू शेट्टी यांना मी आवाहन केलं होतं. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यासंबंधी एक बैठक आयोजित करण्यास सांगितले होते. राजू शेट्टींच्या प्रयत्नांमुळे एफआरपीचा कायदा करण्यात येऊन त्याचं सुत्र ठरल गेलं. तसेच इथेनॉल आणि कोजेनच्या पैशांचं काय करावं याच्या त्याच्या महसूलाचं पण सुत्र ठरलं. मध्यंतरी साखरेचे दर वाढल्याने त्यामुळे राजू शेट्टी यांनी मागील थकित हप्ता दिला पाहीजे अशी त्यांची भुमिका आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या प्रतिक्रिेयेमध्ये राजू शेट्टी यांना आवाहन करताना ते म्हणाले, कि “मी त्यांना विनंती केली होती की, त्यांच्या सीएची टीम जिल्हा बँकेत पाठवावी. जिल्ह्यातील 28 ते 29 साखर कारखाने जिल्हा बँकेतून कर्ज घेत आहेत. राजू शेट्टींनी जिल्ह्यातील कारखान्यांची खाती तपासावीत. जे कारखाने नफ्यात आहेत किवा सरप्लस असतील त्यांना राजू शेट्टी मागतात त्याप्रमाणे द्यायला भाग पाडू. पण ज्यां कारखान्यांची कर्जे जास्त आहेत त्या कारखान्यांनी काय करावे याचाही सल्ला राजू शेट्टी यांनी द्यावा.” असेही त्यांनी म्हटले आहे.
शेवटी बोलताना त्यांनी राजू शेट्टी यांनी चुकिच्या काळात मागणी केली आहे असे सांगताना ते म्हणाले, “या वर्षी पाऊस कमी पडल्याने धरणे सगळीच पुर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. माळरानावरिल उसाच्या पिकांची परिस्थिती वाईट आहे. कर्नाटक राज्याने 25 ऑक्टोबर पासून उस गाळप सुरु करण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्राच्याही आधी आठवडाभर सुरवात करणार आहे. राजू शेट्टी यांची ऊस परिषद 7 तारखेला आहे. त्यामुळे कारखान्यांना पुर्ण क्षमतेने सुरु होण्यास दोन आठवडे लागतील. त्यामुळे महाराष्ट्रातील उस कर्नाटकात जाण्याची भिती आहे. त्यामुळे माझे त्यांना आवाहन आहे. कि त्यांनी सीएंच्या मार्फत चौकशी करावी. ज्या कारखाने सरप्लस किंवा नफ्यातील आहे त्यांना आपण द्यायला लावू.” असे त्यांनी म्हटले आहे.








