ऑनलाईन टीम/तरुण भारत
Gulabrao Patil on bacchu Kadu – Rana Row: अमरावतीत आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातला वाद वाढतच चालला आहे. एकमेकांवर टोकाची टीका करतं आहेत. रवी रानांनी तर ५० खोके घेतल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर केला आहे. यांनतर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच इशारा दिला. माझ्या अस्तित्वावर बोट ठेवाल तर बोटं छाटू असं बच्चू कडू म्हणाले होते. आता या वादावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणा यांनी चुकीचं वक्तव्य केलं आहे. राणांना समज द्यावी अन्यथा लोकांमध्ये संभ्रम पसरेल असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
“आमदारांना समज घालण्याचे अधिकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. मुळाच एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखे आहे. त्यामुळे रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे. कोणीही बिकाऊ नाही, याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
हे ही वाचा : राज्यात राष्ट्रवादीमुळे भाजपचे सरकार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
आमदार रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही, तर मपहकगमपो चुकीचा संदेश जाईल आणि लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल. ४० वर्षांचं करियर पणाला लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो. तसेच दोघांनीही शांत बसवावं, हीच प्रार्थना असंही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.