पणजी : राज्यातील वाढते अपघात हा अत्यंत चिंतेचा विषय असून वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी यासंदर्भात आपण रस्ता सुरक्षा मंडळाची तातडीने व्यापक बैठक बोलावल्याची माहिती दिली. ते म्हणाले की रस्त्यांमुळे अपघात होतात अशी टीका होऊ लागल्यानंतर सरकारने रस्त्यांची दुऊस्ती केली. त्याचा उलट परिणाम म्हणून वाहनचालकांनी वाहनांचा वेग आणखी वाढविला. गोव्यातील जास्तीत जास्त अपघात हे बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळेच झालेले आहेत. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलीस आणि वाहतूक अधिकारी यांनी स्वतंत्रपणे कडक कारवाईची मोहीम राबविली परंतु त्यातून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे नव्याने काही प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यात प्रशिक्षण, समज देणे इत्यादी प्रकार करावे लागणार आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करून देखील वाहनचालक अति वेगाने गाडी चालवणे सोडत नाही त्यातून अपघातांची संख्या वाढत आहे. सरकारने आता आणखीन काय करावे, असे ते म्हणाले. रस्ता वाहतूक सुरक्षा मंडळाच्या बैठकीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनाही समाविष्ट करून घेऊन त्यांच्या काही सूचना मागून घेतल्या जातील आणि त्यानंतर त्यावर कसा तोडगा काढता येईल यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असेही गुदिन्हो म्हणाले.
Previous Articleचलान संख्या वाढली, तरीही अपघात होईना कमी!
Next Article अखेर माडावरुन उतरुन बिबट्या सुखरूप जंगलात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









