मंत्री दिपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
दोडामार्ग – प्रतिनिधी
सावंतवाडीतील जनतेला आपलं कार्य माहित आहे. यापूर्वी ज्या ज्या वेळी सावंतवाडीत येऊन आपल्यावर टीका करण्यात आली त्या त्या वेळी अधिक मते आपल्यालाच मिळाली हा इतिहास आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी विचार करावा असा टोला मंत्री दिपक केसरकर यांनी दोडामार्ग येथे लगावला.









