पुणे / प्रतिनिधी :
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी बालेवाडी-म्हाळूंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचा आढावा घेतला. शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे त्यांनी निर्देश दिले.
यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, अवर सचिव समीर सावंत, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, योजना संचालक महेश पालकर, शिक्षण उपसंचालक श्रीराम पानझडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ, बालभारतीचे विशेष अधिकारी रवीकिरण जाधव आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : मोदी सरकारने कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचविल्या
या बैठकीत शाळांना देण्यात येणारे अनुदान, त्रुटी पात्र शाळा, शिक्षण हक्क कायद्यानुसार दिले जाणारे प्रवेश, 20 व 40 टक्के अनुदान मंजुरीसाठी शाळेकडील प्राप्त प्रस्ताव, तुकडी वाढ, वेतनेत्तर अनुदान, खासगी शैक्षणिक संस्थेत घेण्यात येणारे शैक्षणिक शुल्क, त्रुटी समितीचा अहवाल, त्यानुसार निर्गमित करण्यात आले शासन निर्णय आदी विषयवार चर्चा करण्यात आली.