Minister Chandrakant Patil पुण्याच्या धर्तीवर आता कोल्हापुरातील फिरते वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी त्यांनी पुस्तकाचे महत्व सांगत पुस्तक अधिक वाचा कारण वाचल्याशिवाय जगात काय सुरू आहे कळणार नाही. मात्र वाचताना ते नीट वाचा नाहीतर म्हणताना एक म्हणतो आणि अर्थ वेगळाच काढतो असं होऊ देऊ नका. समजलं नाही तर दोन दोन वेळा वाचा मात्र करू “धा च म” करू नका असा सल्ला त्यांनी वाचकांना दिला आहे.
पुस्तकांचे महत्त्व पटवून देण्यासाठी गेल्या वर्षभरापासून पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने फिरते ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे तर हीच संकल्पना घेत पुण्याच्या धर्तीवर आता कोल्हापुरात देखील फिरते ग्रंथालय चंद्रकांत दादांनी सुरू केले असून या ग्रंथालयात तब्बल सहा हजार पुस्तके असणार आहेत. हे ग्रंथालय दररोज एका भागात जाऊन विना पैसे मोफत वाचण्यासाठी दिले जाणार आहे. या संकल्पनेचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरातील दसरा चौकात पार पडला. यावेळी बोलताना चंद्रकांत दादा यांनी वाचकांना पुस्तकाचे महत्त्व पटवून दिले सोबतच गेली अनेक वर्ष पुस्तक वाचले जातात मात्र सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलवर ही पुस्तके आले आहेत मात्र तरीही आम्ही जुनी माणसं असल्याने आम्हाला मोबाईल पेक्षा प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यास चांगलं वाटतं असे म्हणत पुस्तक अधिक वाचा कारण वाचल्याशिवाय जगात काय सुरू आहे कळणार नाही. मात्र वाचताना ते नीट वाचा नाहीतर म्हणताना एक म्हणतो आणि अर्थ वेगळाच काढतो असं होऊ देऊ नका. समजलं नाही तर दोन दोन वेळा वाचा मात्र करू “ध च म” करू नका असा सल्ला त्यांनी वाचकांना दिला आहे. दरम्यान आज ग्रामपंचायत प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने चंद्रकांत दादा स्वतः निवडणूक प्रचारात उतरले असून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये ते आज प्रचारासाठी जात आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









