रियो डी जनेरियो
ब्राझीलच्या बाहिया राज्यात भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली एक मिनीबस आणि ट्रक यांची टक्कर झाल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. साओ जोस डो जॅकुइप शहरानजीक एका महामार्गावर ही दुर्घटना घडली असून यात 6 जण जखमी झाले आहेत. मिनीबस बाहियाच्या उत्तर किनाऱ्यावरील ग्वाराबुजा येथून जॅकोबिना शहराच्या दिशेने प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर जॅकोबिनाच्या नगरपालिकेने तीन दिवसांच्या शोकची घोषणा केली आहे…..









