न्हावेली / वार्ताहर
कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली गावामध्ये कोकणची पारंपरिक लोककला असणारा दशावतार मिनी नाट्यमहोत्सव होणार आहे.स्वप्नपूर्ती मठकर फाऊंडेशन आणि सोनुर्ली पाक्याचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोनुर्ली हायस्कूल नजीक शुक्रवार १६ रोजी रात्री ९ वाजता ( देवेंद्र नाईक प्रस्तुत ) चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ चेंदवण यांचा “ परकाया प्रवेश अर्थात राजा त्रि विक्रम “ व शनिवार १७ रोजी रात्री ९ वाजता ( सुनील गोसावी प्रस्तुत ) अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण यांचा “ लेक माझी तुळजाभवानी “ हा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
Previous ArticleArun Dongale Gokul 2025 : आम्ही एकसंघ, डोंगळेंनी भूमिका ठरवावी, विश्वास पाटलांकडून कानउघाडणी
Next Article चालू वर्षाच्या बेदाणा हंगामात १७ हजार गाडी आवक









