वृत्तसंस्था/ हॅरिसन (अमेरिका)
येथे झालेल्या फुटबॉल सामन्यात इंटरमियामी क्लबने न्यूयॉर्कच्या रेड बुल्सचा 5-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात अर्जेंटिनाच्या लायोनेल मेस्सीने तसेच टेलास्को सिगोव्हिया यांनी प्रत्येकी 2 गोल केले.
लायोनेल मेस्सीने गेल्या सात सामन्यात एमएलएसच्या इतिहासामध्ये 35 गोलांची नोंद केली असून हा एक विक्रमच आहे. या सामन्यात इंटरमियामीने केवळ 3 मिनिटांच्या कालावधीत 2 गोल केले. मध्यंतरापर्यंत इंटरमियामीने 2-0 अशी आघाडी घेतली होती. इंटरमियामीचा 5 वा गोल जॉर्डी अल्बाने केला. मेस्सीने 60 व्या आणि 75 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. 2025 च्या फुटबॉल हंगामातील मेस्सीने आतापर्यंत 18 गोल विविध स्पर्धांमध्ये नोंदविले आहेत. या विजयामुळे रेड बुल्सने 26 गुणांसह वरचे स्थान पटकाविले आहे.









