Millions of rupees funds available for the development of Sawantwadi city due to the Guardian Minister – Bunty Purohit
सावंतवाडी शहराच्या विकासामध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने भर पडण्यास सुरवात झाली आहे. घराच्या विकासासाठी त्यांनी भरभर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शहराचा विकास आता गतीने होईल असा विश्वास भाजपचे जिल्हा युवक चिटणीस बंटी उर्फ भरत पुरोहित यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणतात आठ महीन्याच्या कालावधीतच पालकमंत्री पदाच्या माध्यमातून सावंतवाडी शहराची गरज ओळखुन अत्यंत महत्वाचा असा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी ५६ कोटी रुपयांची पाणी योजना मंजुर केली. तसेच शहराच्या अग्नीशमन यंञणे करीता सुसज्य ईमारतीसाठी 3 कोटि २८ लख रुपयांचा निधी मंजूर केला त्याचप्रमाणे शहरातील भाजी .. मंडईच्या नवीन इमारतीकरीता दोन कोटी 93 लाख रुपयांचा निधी मंजुर केला.









