उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा खूप कोरडी होते. त्यामुळे चेहरा निर्जीव दिसू लागतो. कडक ऊन आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा त्वचा खूप कोरडी होते.अशावेळी तुम्ही चेहऱ्यावर दुधाची साय किंवा मलई लावू शकता. कोरड्या त्वचेसाठी दुधाची साय खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया त्वचेवर दुधाची साय कशी लावायची.
बहुतेक लोक स्किन केअरसाठी सुद्धा नॉर्मल हळद वापरतात. तसं तर याने फायदा होतो. तरी वाइल्ड किंवा जंगली हळद ही फक्त त्वचेसाठी असते. अशा वेळी दुधाच्या सायमध्ये जंगली हळद घालावी. हा पॅक सर्कुलर मोशनमध्ये मसाज करून चेहऱ्यावर लावा. नंतर काही वेळ चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ करा.
त्वचेची चमक वाढवण्यासाठी तुम्ही दुधाच्या सायमध्ये लिंबू मिक्स करुन लावू शकता. या दोन्ही गोष्टी त्वचेला चांगल्या प्रकारे स्वच्छ करतात आणि क्रीम चेहऱ्याची चमक वाढवते आणि कोरडेपणा दूर करते. ते लावण्यासाठी सायमध्ये लिंबाचा रस घाला आणि नंतर काही वेळ चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा सामान्य पाण्याने स्वच्छ करा.
(वरील बातमी ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









