उद्या कसबा बीड परिसरातील उत्पादक एकत्र येऊन देणार निवेदन
कसबा बीड प्रतिनिधी
कसबा बीड ता करवीर येथे कसबा बीड,बहिरेश्वर,म्हारुळ आदी परिसरातील दूध उत्पादक सभासदांनी आज गोकुळ दूध संघातर्फे जाहीर केलेल्या दर पत्रक बाबत नाराजी व्यक्त करून गाईचे दूध दर कमी केल्यामुळे बैठक घेण्यात आली. यास विरोध म्हणून सर्व दूध उत्पादक उद्या एकत्र येऊन गोकुळ दूध संघास राजेंद्र सूर्यवंशी यांच्या समवेत निवेदन देण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले.
या बैठकीदरम्यान बोलताना राजेंद्र सूर्यवंशी यांनी बहिरेश्वर येथे 17 गाई व म्हारुळ येथे 10 ते 12 गाई लंपी आजाराने मृत्युमुखी झाले आहेत.त्या सभासदांना गोकुळतर्फे नुकसान भरपाई म्हणून काही देण्यात आलेले नाही. अशा उत्पादकांना किमान 10,000 रुपये द्यावे, व गोकुळ दूध संघाने उत्पादकांना दूध दरवाढ द्यावी , असे सांगितले.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने बहिरेश्वर या गावातील गाय दूध उत्पादक जास्त असल्याने शेतकऱ्यांचा 80 लाख तोटा ,तर म्हारूळ या गावातील उत्पादकांचा 50 लाख तोटा या दूध दर कपातीमुळे होणार असल्याचे उत्पादकांनी सांगितले.
तीन महिन्यापूर्वी 2 रुपये कमी केले असताना आता वार्षिक जनरल सभा झाल्यानंतर परत 2 रुपये कमी करणे कितपत योग्य आहे ?असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.अमूल दूध संघास गाय दुधासाठी 37 रुपये देणे परवडते तर गोकुळ संघास का परवडत नाही ? असाही प्रश्न उपस्थिताने केला.इतर दूध संघ व गोकुळ दूध संघ यामध्ये दराची तफावत दिसून येत आहे.यावर योग्य ते तोडगा काढावा असे सर्वांना मते सांगण्यात आले.जर यावर योग्य तोडगा काढला नाही तर उत्पादकांना इतर पर्याय शोधावे लागतील याची नोंद घेण्यात यावी असे उत्पादकांच्या मनोगतातून सांगण्यात आले.यावेळी कसबा बीड परिसरातील असणारे दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य असणारा गोकुळ दूध संघ.दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुय्यम व्यवसाय प्राप्त करून देणारा व 3,13 ,23, सूत्रानुसार शेतकऱ्यांना व्यवसाय देणारा संघ म्हणून याची ख्याती आहे.10 दिवसाला 60 कोटी व महिन्याला 180 कोटी देणारी मातृसंस्था संस्था आहे.त्यामुळे बाजारात होणारी गाय दुधाची मागणी व सध्याचे मार्केट यावरून होणारा खर्च या सर्व बाबींचा विचार केला तर दूधउत्पादक व गोकुळ दूध संघ यांच्यात समन्वय होणे गरजेचे आहे.