कसबा बीड प्रतिनिधी
गोकुळ दुध संघाने गाय दुध दरात केलेली कपात पुर्ववत करणे आवश्यक आहे असे सर्वपक्षीय करवीर तालुक्यातील दूध उत्पादकांची बीडशेड येथील महालक्ष्मी हाॅल येथे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीत मनोगत व्यक्त केले. ही बैठक पाडळी खुर्दचे सिताराम पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी राजेंद्र सुर्यवंशी यांनी अमूल दूध संघ व आपली मातृसंस्था गोकूळ दूध संघ या दोन्ही दूध संघातील दर फरक किती आहे हे सांगितले .
अमूल संघाच्या म्हैस दूध दरात १०.० फॅटला गोकुळ च्या दरापेक्षा १८ रू जास्त तर गाय दूध दरात १.२० पैसे दर जास्त असलेच सांगितले .जर अमूल संघाला दर देणे परवडते तर गोकुळ ला का परवडत नाही? असा सवाल उपस्थित केला.दूध संघाने दिवाळीपूर्वी दुध दरात केलेली कपात निदान पूर्ववत करावी असा अल्टीमेटल देण्यात आला.अन्यथा दूध संघावर मोर्चा काढूच असा इशाराही सूर्यवंशी यांनी दिला.
बहिरेश्वर येथील दूध उत्पादक सभासद चंद्रकांत चौगले यांनीही आपण नोकरी नसलेन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास कर्ज काढून जनावरे घेतली आहेत.बॅक हप्ता जावून कसाबसा तरी संसाराचा गाडा चालवत होतो पण दुध संघाने दरात कपात तर पशूखाद्य दरात भरमसाठ वाढ करून आमच्या सारख्या हजारो तरूणांचे कंबरडे मोडले आहे,तरी आदरणीय चेअरमन व संचालक मंडळाने आमच्या मागण्या विचारात घेवून कपात केलेल्या दरात वाढ करून दरवाढ निदान पुर्ववत तरी करावी अशी मागणी केली.
या सभेला शामराव सूर्यवंशी,प्रा टी एल पाटील,सर्जेराव पाटील,(खांटागळे),पैलवान शिवाजी पाटील (म्हारूळ,) करण प्रकाश पाटील (कोगे),विलास चौगले (पासार्डे)अनिल बचाटे ,अमर खाडे,शरद चौगले,सागर पाटील (बहिरेश्वर) तसेच आमशी, म्हारूळ, पासार्डे,बारा वाड्या, गणेशवाडी, बहिरेश्वर,शिरोली,वाकरे,खांटागळे,बाचणी,आदी गावातील दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना चांगला दर द्यावा,ज्या ठेवी ठेवल्या आहेत, त्या कमी व्याजदरात असल्यामुळे त्या संस्थेना परत द्याव्यात.वजन काटे योग्य असावेत,लंपी आजाराने दगावलेल्या पशुपालकांना मदत करावीअसे दूध उत्पादकांच्या कडून ठराव करण्यात आले.









