मार्केटिंग अहवालानंतरच पुढील विचार : संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी /फोंडा
गोवा डेअरीची आर्थिक स्थीती सध्या नाजूक असल्याने दूध दरवाढीशिवाय पर्याय नाही. मात्र नवीन वर्षाच्या आरंभीच ही दरवाढ केल्यास, तिचा विक्रीवर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी मार्केटिंग विभागाचा अहवाल आल्यानंतरच दरवाढ करायची की नाही, यावर निर्णय घ्यावा लागेल. तुर्त दरवाढीचा विषय स्तगित ठेवण्याचा निर्णय गोवा डेअरी संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अतिरिक्त कामगार भरतीमुळे डेअरीवर आलेला आर्थिक ताण व अन्य विषयांवर चर्चा झाली. बैठकीला उल्हास सिनारी, विठोबा देसाई, विजयकांत गावकर, गुरुदास परब, माधव सहकारी, बाबुराव फट्टो देसाई, उदय प्रभू, नितीन प्रभूगावकर, बाबू फाळो व अनुप देसाई हे 12 पैकी 11 संचालक तसेच व्यवस्थापकीय संचालक योगेश राणे हे उपस्थित हेते.
डेअरीचे उत्पादन व कार्मचाऱयांचे वेतन यामध्ये ताळमेळ जुळत नाही. परिणामी 42 कामगारांच्या अतिरिक्त भरतीमुळे आर्थिक ताण वाढलेला आहे. रोजंदारीवर असलेल्या 9 कामगारांना कमी करण्यात आले असून उर्वरीत कामगारांच्या भवितव्याचा निर्णय कायदेशीर सल्ल्यानंतर घेण्यात यावा असे बैठकीत ठरले. आर्थिक सुधारणा, दूध उत्पादनात वाढ व अन्य विषयांवर चर्चा झाली.









