बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती शिवाजी उद्यान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक घालून पूजन करण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सुलोचना शिनोळकर, श्वेता कुंटे, संगीता कुंटे व विद्या पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शिवाजी उद्यान परिसरात महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसराला सजावट करण्यात आली होती. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त छत्रपती शिवाजी उद्यान येथे हिंदू बांधवांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पुंडलिक चव्हाण, अजित जाधव, विजय कुंटे, मारुती पाटील, सुशांत तारळेकर, आनंद कांबळे, उदित रेगे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
Previous Articleसाईराज वॉरियर्स संघाची अंतिम फेरीत धडक
Next Article बेळगाव-रामनगर-पणजी महामार्गाचे काम कासवगतीने
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









