निवडणूक टाळली : सू की यांना माफी
वृत्तसंस्था/ यंगून
म्यानमारमध्ये 2021 साली सत्तापालट केलेल्या सैन्याने तेथील आणीबाणीचा कालावधी 6 महिन्यांनी वाढविला आहे. म्यानामारमधील आणीबाणीची मुदत 31 जुलै रोजी संपुष्टात येणार होती, परंतु त्यापूर्वीच सैन्याच्या नेतृत्वाखालील नॅशनल डिफेन्स आणि सिक्युरिटी कौन्सिलने बैठक घेत आणीबाणी वाढविली आहे. सैन्याने ऑगस्ट महिन्यात होणारी निवडणूकही टाळी आहे.
सैन्याने म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांना काही आरोपांप्रकरणी माफी दिली आहे. आंग सान सू की यांना सैन्याने 5 विविध प्रकरणांमध्ये दोषी ठरवून 33 वर्षांची शिक्षा सुनावली होती. सैन्याकडून एकूण 7 हजार लोकांना माफी देण्यात आली आहे. परंतु सैन्याकडून आंग सान सू की यांची मुक्तता करण्याऐवजी त्यांना स्थानबद्ध करण्यात येणार आहे.









