सावंतवाडी : प्रतिनिधी
शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष हे औचित्य त्यावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कोकण प्रांताच्या शिव शौर्य यात्रेचे जंगी स्वागत सावंतवाडीत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जयप्रकाश चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला नेत्या अर्चना घारे परब व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी हार अर्पण केला. त्यानंतर छत्रपती शिवरायांना वंदन करून जय शिवाजीची घोषणा देण्यात आली. यावेळी भाजपचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही महाराजांना हार घालून नमस्कार केला. यावेळी भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राकेश नेवगी, एडवोकेट सायली दुभाषी आदी उपस्थित होते.









