वृत्तसंस्था / कोलंबो
सध्या बांगलादेशचा क्रिकेट संघ लंकेच्या दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर आता येथे बुधवारपासून दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. लंकेचा 22 वर्षीय गोलंदाज मिलन रत्ननायके या कसोटीत दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्याच्या जागी विश्वा फर्नांडोला लंकन संघात स्थान देण्यात आले आहे.
उभय संघामध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत मिलन रत्ननायकेने 65 धावांत 4 गडी बाद केले. या कसोटीत खेळताना मिलन रत्ननायकेला स्नायु दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने त्याला दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. पहिल्या कसोटीत मिलन रत्ननायकेने चिवट फलंदाजी करत कमिंदु मेंडीस समवेत सातव्या गड्यासाठी 84 धावांची भागिदारी केली होती.
लंकन संघ: धनंजय डिसील्वा (कर्णधार), पी. निशांका, ओशादा फर्नांडो, उदारा, दिनेश चंडीमल, कमिंदु मेंडीस, कुशल मेंडीस, वेलालगे, पी. सूर्याबंदारा, सोनल दिनुशा, पी. रत्ननायके, प्रभात जयसूर्या, टी. रत्ननायके, अकिला धनंजय, विश्वा फर्नांडो, असिता फर्नांडो, रजिता आणि विजेसुंदरा.









