बेळगाव : चिकोडी तालुका शरिरसौष्ठव संघटना व बेळगाव जिल्हा शरिरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चिकोडी तालुकास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धेत एच. ग्रुपच्या मिलन कांबळे पिळदार शरीराच्या जोरावर मि. चिकोडी किताबाचा मानकरी ठरला. चिकोडी येथे आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा 55 ते 65 वरील अशा चार वजनी गटात घेण्यात आले. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
55 किलो वजनी गट : 1) वासिम तांबोळी (एकसंबा), 2) चिकय्या कांबळे (आयएफएफओ फिट) 3) वाजिद नायकवाडी (आयएफएफओ फिट) 4) प्रज्वल पाटील (एपआरफीट) 5) तनवीर द•ाrकर (आयएफएफओ).
60 किलो गट : 1) रूपेश पानकी (एच ग्रुप) 2) श्रीधर कित्तूर (एच. ग्रुप) 3) श्रीधर गस्ती (आयएफएफओ).
65 किलो गट : 1) मिलन कांबळे (एच. ग्रुप) 2) लखन कांबळे (एच. ग्रुप) 3) इंद्रजित कदम (आयएफएफओ).
65 वरील गट : 1) एम.डी. साकीब दंगरकी (7 स्टार) 2) हर्ष जुगळी (7 स्टार) 3) गोपी गंगाळे (आयएफएफओ) यांनी विजेतेपद पटकाविले.
त्यानंतर मि. चिकोडी किताबासाठी वसिम तांबोली, रूपेश पानकी, मिलन कांबळे, साकीब दंगरकी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये मिलन कांबळेने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि.चिकोडी हा किताब पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मिलन कांबळेला मानाचा किताब, आकर्षक चषक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून एम. गंगाधर, काटेश गोकावी, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, सुनील राऊत, नूर मुल्ला, लक्ष्मण तोटगी यांनी काम पाहिले.









