सेनादलाचे मोहन नाईक संयुक्त विजेते
बेळगाव : पर्यावरण आणि प्रशिक्षण विभाग बेळगाव यांच्यावतीने इन्फंट्री गोल्फ चॅम्पियनशिप स्पर्धेत मिहीर पोतदारने इन्फंट्री गोल्फ चषक पटकावित आपली परंपरा टिकवून ठेवली आहे. भारतीय लष्कराचे मोहन नाईक यांनी संयुक्त विजेतेपद पटकाविले. बेळगाव येथील पर्यावरण आणि प्रशिक्षण विभाग यांच्यावतीने बेळगावच्या गोल्फ मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या इन्फंट्री गोल्फ चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र, बेंगळूर, हुबळी, कोल्हापूर व गोवा व बेळगावच्या जवळपास दीडशेहून गोल्फपटूंनी भाग घेतला होता. सदर स्पर्धा पाच गटात घेण्यात आली. भारतीय लष्कराचे मोहन नाईक यांनी संयुक्त विजेतेपद पटकाविले. इन्फंट्री चषक मिहीर पोतदार यांनी पटकाविल्याचे घोषित केले.
मिहीर पोतदार व मोहन नाईक यांचे 40 समान गुण झाले होते. परंतु प्रमुख होलमध्ये मिहीरने बाजी मारल्यामुळे त्याला विजयी घोषित केले. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते मिहीर पोतदारला इन्फंट्री चषक देऊन गौरविण्यात आले तर मोहन नाईक यांनाही चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी गोल्फ संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुर्वी ही अनिल पोतदार यांनी अनेक गोल्फ स्पर्धेत चमक दाखवुन यश मिळविली होते. वडीलांची परंपरा मिहिरने चालू ठेवली आहे. मिहीर पोतदार यांच्या गोल्फ क्षेत्रात यशस्वी मोहिमेमध्ये हा विजय एक नवा टप्पा ठरतो. ‘मराठा गोल्फ कप’ जिंकून आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला होता. इन्फंट्री चषक व सध्या पुन्हा या स्पर्धेत विजय मिळवून त्यांनी आपल्या सातत्याची साक्ष पटवली. गोल्फच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.









