सावंतवाडी । प्रतिनिधी
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव तथा युवा सामाजिक कार्यकर्ते मिहीर मठकर यांना त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल जनजागृती सेवा संस्थेचा ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार २०२५’ जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण शनिवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कणकवली येथील भवानी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या पुरस्कारामुळे मिहीर मठकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर आणि सचिव संचिता भंडारी यांनी मिहीर मठकर यांचे अभिनंदन केले आहे .









